26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
HomeFeaturedसलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचे कॅनडा कनेक्शन?

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचे कॅनडा कनेक्शन?

 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार कोणी आणि का केला? याबद्दल अद्याप काहीही कळू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज देखील लागले आहेत. अशात सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा संबंध कॅनडाशी जोडला जात आहे. कारण पंजाबी गायक गिप्पी ग्रेव्हाल याच्या कॅनडा येथील घरी फायरिंग करण्यात आली होती. एवढंच नाहीतर, फेसबूकवरून देखील गिप्पी ग्रेव्हाल याला २०२३ मध्ये धमकी देण्यात आली होती. ज्यामध्ये सलमान खान याच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला होता.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपमधून पाठवण्यात आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘खूप सलमान भाई-सलमान भाई करत फिरत असतो आता तुझा भाई देखील तुझा बचाव करु शकत नाही दाऊद किंवा कोणी अन्य डॉन तुझी रक्षा करेल असं समजू नकोस’

‘सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर तू जे काही बोलला आहेस, ते विसरता येणार नाही याचा परिणाम तुला नक्कीच भोगावा लागेल, तुला ज्या देशात पळून जायचं असेल तर जा पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव मृत्यूला कधीच कोणता व्हिसा नसतो’ असा इशारा गिप्पी ग्रेव्हाल याला देण्यात आला होता.

तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानेही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र, आजच्या गोळीबारामागे कोणाचा हात आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. या गोळीबाराची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

लॉरेन्स बिश्नोई अँगलवरूनही पोलीस तपास सुरू झाला आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात झोन ९ डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR