Homeसोलापूरवेदनांशी मैत्री करणारे कवी माधव पवार यांचे निधन

वेदनांशी मैत्री करणारे कवी माधव पवार यांचे निधन

सोलापूरात अन्त्यसंस्कार

मुंबई : मृत्यूचे वास्तव अशा पंक्तीमधून व्यक्त करणारे आणि शारिरीक वेदनांशी दोस्ती करून मृत्यूला एक उत्सव मानणारे मराठीतील ज्येष्ठ कवी माधव पवार (७१, रा. निर्मिती टॉवर्स, मोदीखाना) यांचे बुधवारी पहाटे चार वाजता येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कवी माधव पवार हे गेल्या बारा ते तेरा वर्षापासून मूत्रपिंडाच्या विकारानं आजारीच होते. पण डायलिसिस करून आल्यानंतर ते साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे. उत्तम कविता व सूत्रसंचालन ते करायचे. महिन्याभरापूर्वीच त्यांची प्रकृती खुपच खालावली होती. डायलिसिसलाही शरीर प्रतिसाद देत नव्हते. उपचाराची सर्व पध्दती निष्क्रिय ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून घरीच ठेवण्याचा व उपचार करण्याचा सल्ला दिला. दिवसेंदिवस प्रकृती ढासळत होती. त्यातच त्यांचे पहाटे प्राणोत्क्रमण झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR