36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील

अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील

बारामती : शनिवारी बारामतीमध्ये झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण ४ जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, अशी टीका केली होती. यावरच देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असा पलटवार करत अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी हल्लाबोल केला आहे.

अजित पवार यांना ४ जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील, तसेच पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. बारामतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. अजित पवार यांच्यापाठी भाजपची अजस्त्र यंत्रणा आहे. मात्र, शरद पवार यांचा वैयक्तिक करिष्मा आणि जनसंपर्क बारामतीमध्ये वरचढ ठरू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR