राममंदिर चोरी आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची तयारी

अयोध्या : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात आता ट्रस्टच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पहिल्यांदाच राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त महंत दिनेंद्र दास महाराज यांनी माजी पदाधिकारी गोपाल राव यांच्यावर आरोप केले.

ते म्हणाले पूर्ण चूक गोपाल राव यांची आहे. ते राजकारण करत आहेत. ते सगळ्यांना गोंधळात टाकतात. ते रामाची परंपरा मानत नाहीत. गोपाल राव राम मंदिराचे बांधकाम प्रभारी आणि ट्रस्टचे आमंत्रित सदस्य होते. मूळचे ते कर्नाटकचे रहिवासी आहेत.

दरम्यान, अयोध्या बार असोसिएशनच्या वकिलांनी चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार दिली. बार असोसिएशनचे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्र म्हणाले. आमच्या तक्रारीत चार लोकांची नावे आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की एफआयआर दाखल केला जाईल. सूत्रांनुसार, देणगी चोरीच्या आरोपींविरोधात सरकार कठोर कारवाई करणार आहे. प्रशासनाने आरोपींच्या नवीन घरांवर बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू केली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाने अशा घरांची ओळख पटवली आहे, ज्यांचा नकाशा मंजूर नाही किंवा ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्या आरोपींची घरे रडारवर आहेत, जी त्यांनी मंदिरात नोकरी मिळाल्यानंतर बांधली. आरोपी लवकुश मिश्राचे शहादतगंजमध्ये बांधकाम सुरू असलेले घर आणि अनुकल्प मिश्राचे कौशल पुरी येथील घरावर बुलडोझर फिरवला जाऊ शकतो. अयोध्या विकास प्राधिकरण आजच त्यांना नोटीस पाठवू शकते.

आरोपी अविनाश शुक्लाचा भाऊ अमित शुक्लाचा हातात नोटांच्या गड्डया असलेला एक व्हीडीओ समोर आला आहे. पोलिस या व्हीडीओची चौकशी करत आहेत. आरोपी अविनाश शुक्लाचा भाऊ अमित शुक्लाचा हातात नोटांच्या गड्ड्या असलेला एक व्हीडीओ समोर आला आहे. पोलिस या व्हीडीओची चौकशी करत आहेत.

अनिल मिश्रा यांची चौकशी होणार
पोलिसांनी ३० जून रोजी अयोध्या कारागृहात आरोपी अविनाश शुक्लाची चौकशी केली होती, आता पुढील तपास करत आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची रविवारी ३ तास चौकशी झाली आहे. आता त्याची पडताळणी करण्यासाठी अनिल मिश्रा यांची आज चौकशी होऊ शकते. आरोपी लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा यांच्या नियुक्तीतील त्यांच्या भूमिकेची चौकशी केली जाईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news