परभणीत वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नाविरोधात निदर्शने; महापालिकेच्या विरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशनचा एल्गार

परभणी : शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमण, पत्र्यांचे शेड, बांधकाम साहित्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न, वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटी तसेच दंड वसुलीच्या कार्यवाहीत कपात करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू या संदर्भात कुठलीही कार्यवाही न झाल्याने महापालिकेच्या विरोधात गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया युथ फेडरेशनने निदर्शन आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एका बाजूला शहरातील वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असताना दुस-या बाजूला शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग, बांधकाम साहित्यामुळे चौका-चौकात वाहतूक कोंडी होत आहे. परंतू या संदर्भात कुठलीही प्रभावी कारवाईत करण्यात येत असल्याचे दिसत नाही. वाहतूक पोलिस केवळ चालन किंवा दंड वसूल करण्यातच कार्यमग्न असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करुन शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

परभणी शहरातील घरासमोरील अतिक्रमण तातडीने काढण्याचे जाहीर आवाहन करण्यात यावे. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-याविरुध्द महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी. शहरातील बसस्थानक, महात्मा फुले चौक, नारायण चाळ चौक, ग्रँड कॉर्नर, जिंतूर रोड, उड्डाणपूल, खानापूर फाटा, काळी कमान व वसमत रोड येथे गर्दीच्या वेळेत पुरेसे वाहतूक पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत.

शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत स्कूल बस मार्गांवर विशेष वाहतूक नियंत्रण व्यवस्था निर्माण करावी. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी रस्ते मोकळे ठेवण्याची व्यवस्था करावी. प्रमुख चौकांमध्ये आवश्यकतेनुसार वाहतूक सिग्नल, नो-पार्किंग फलक, झेब्रा क्रॉसिंग व दिशादर्शक फलक बसवावेत. नागरिकांना वाहतूक संदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र तक्रार अ‍ॅप किंवा मोबाईल नंबरलब्ध करून द्यावा अशी मागणी ऑल इंडिया युथ फेडरेशनचे संदिप सोळुंके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील उपोषण मैदान येथे गुरुवारी करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनात ऑल इंडिया युथ फेडरेशन, लालबावटा चालक-मालक संघटना परभणी, संघर्ष शालेय वाहन संघटना परभणीच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग नोंदविला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ

कोलकाता : बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक चक्रीवादळ निर्माण झाले...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या विटंबनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; मडकी फोडून निषेध
02:25
Video thumbnail
Himayatnagar News | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टची ११ लाखांची मदत
02:16
Video thumbnail
Nanded News | अशोक चव्हाणांसह चार आमदारांना धमकी देत खंडणीची मागणी; आरोपी मुंबईतून अटकेत
03:59
Video thumbnail
Latur Crime News | कोऱ्या बॉण्डपेपरवर सह्या घेऊन घर हडपल्याचा आरोप; महिला सावकाराविरोधात गुन्हा
02:16
Video thumbnail
Latur Crime News | अवैध सावकारीचा थरार; एक कोटींच्या व्यवहारावरून मारहाण, जीवे मारण्याची धमकी
02:55
Video thumbnail
Latur News | मनपा झोन कार्यालयात टाळ वाजवून भजन आंदोलन; अवैध बांधकामे हटवण्याची मागणी
06:23
Video thumbnail
Latur News|मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपये मागितल्याचा आरोप
04:00
Video thumbnail
Micro Finanace |फायनस कंपनीच्या एजंटची लातूरच्या शेतकऱ्याला शिवीगाळ..
01:41
Video thumbnail
Nanded News| माहूरच्या दत्त मांजरीत २०० हून अधिक गांजाची झाडे जप्त;एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल
01:50
Video thumbnail
Nanded News | माहूरमध्ये ८३ किलो गांजा जप्त; ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ११८ झाडे उद्ध्वस्त
02:27
Video thumbnail
Latur News |आमदार अमित देशमुखांच्या हस्ते किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे उद्घाटन
09:08
Video thumbnail
Latur News | पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाची कारवाई; २५ जणांना दंड, २६७ जणांना नोटिसा
02:05
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53

Latest news