शनिवारपासून उन्हात आंदोलन करणार

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या ३० मे पासून अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. सरकारला गेल्या १० महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही असे जरांगे यांनी म्हटले. उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल असे मनोज जरांगे म्हणाले. मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला १० महिने वेळ दिल्याचे सांगितले. माझा नाइलाज आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकराला, समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. मी सीमारेषेवर आलेलो आहे, ३० मे चे आमरण उपोषण ठरवले आहे, त्यात बदल केला आहे. आमरण उपोषण सावलीत, मंडपात, फॅनमध्ये आपण ते करत होतो, सगळे तसेच करतात. मला अंतिम टोकाचे आणि कठोर आमरण उपोषण करायचे आहे, रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे. ना कुठले पाणी, ना कुठले जेवण, ना पायात चप्पल घालणार असे मनोज जरांगे म्हणाले.

माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत, जे काही होईल ते होईल, उष्माघाताचा बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला, तर आपण आपली कदर का करायची असे मनोज जरांगे म्हणाले. आमरण उपोषण कुठेही होईल, जंगलात होईल, रानात होईल, कडक उन्हात ते उपोषण होईल यावर मी ठाम आहे. किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवलं आहे. सारखी सारखी उपोषणं करून जीवाला वेदना होत आहेत. एकदा तुकडा पडू देत, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल. हे आंदोलन सुरू आहे त्याला तीन वर्षे झाली आहेत. मे महिन्याच्या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

कुणबी मराठा मंत्रालय स्थापन करायला वेळ का लागतोय?
माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा होतोय, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आमरण उपोषण फायनल झाले आहे, यात बदल होणार नाही. मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे येऊ नये, असेही मनोज जरांगे यांनी आवाहन केले आहे. देशात इतके टोकाचे आमरण उपोषण झाले असेल असे वाटत नाही, असेही जरांगे यांनी म्हटले. प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील येणार की नाही हे मला माहिती नाही. २९ ऑगस्टपासून उद्यापर्यंत १० महिन्यांचा वेळ दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news