बीड जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर

बीड : मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसाने आष्टी तालुक्यात हाहाकार माजवला होता. अनेकांचा जीव गेला होता, तर काहींना जीवदान देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी रात्री झालेल्या पावसानेही पुन्हा हाहाकार माजवला. आष्टीसोबतच शिरूरलाही याचा फटका बसला. सिंदफना नदी पात्राला महापूर आल्याने बाजारपेठ पाण्याखाली गेली. अनेकांच्या दुुकानात, घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले.

लोकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. हे पाणी ओसरत नाही तोच पुन्हा सोमवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. गेवराईसह इतर भागांत जोरदार पाऊस झाला. बीडमध्येही रविवारी रात्री झालेल्या पावसाने अनेक मार्गांवर पाणी साचले होते.

बीड शहरातील अनेक भागात नाल्या नसल्याने आणि नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी रस्त्यांवर आले. धांडे नगरसह इतर भागातील लोकांना पाण्यामुळे ये-जा करणे बंद झाले होते. या भागातील लोकांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसूनच आंदोलन केले. तसेच केएसके कॉलेजसमोरही नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले. जालना रोडवरही पाणी रस्त्यावर आले. अनेक भागात दुकान, घरात पाणी शिरल्याने हाल झाल्याचे पाहायला मिळाले. बीड पालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सोमवारी दुपारी पाणी आलेल्या भागांची पाहणी केली.

आतापर्यंत ७११.२ मिमी पाऊस
बीड जिल्ह्यात जून ते २१ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत ७११.२ मिमी पाऊस झाला आहे, तर मागच्या वर्षी २१ सप्टेंबर रोजीपर्यंत ७०४ मिमी पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत १४५ मिमी अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने पर्जन्यमानाची आकडेवारी वाढत चालली आहे. मागच्या वर्षी जेवढा पाऊस सप्टेंबरपर्यंत झाला होता, तेवढाच पाऊस यंदा सुद्धा झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जिल्ह्यातील २९ मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे २९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बीड तालुक्यातील राजुरी मंडळामध्ये (८२.८ मिमी), पेंडगाव (७०.५ मिमी), मांजरसुंबा (९०), चौसाळा (९५.५), नेकनूर (६६.३), लिंबागणेश (१०७.३), येळंबघाट (६६.३), च-हाटा (८२.८), पारगाव सिरस (८२.८), पाटोदा तालुक्यातील पाटोदा मंडळामध्ये (७४.३), अंमळनेर (६७), आष्टी तालुक्यातील दौलावडगाव मंडळामध्ये (८०), धामणगाव (६७.५), डोईठाण (६७), धानोरा (६५.८), दादेगाव (६५.८), गेवराई तालुक्यातील गेवराई मंडळामध्ये (७९.३), धोंडराई (८७.३), उमापूर (६७), चकलंबा (६७), रेवकी (७७.८), तलवाडा (११५.३), धारूर तालुक्यातील धारूर मंडळामध्ये (८६.८), शिरूर कासार तालुक्यातील शिरूर मंडळामध्ये (६७.३), रायमोहा (६८.८), तिंतरवणी (६७), ब्रम्हनाथ येळंब (६७.३), गोमळवाडा (६७), खालापुरी (६८.८ मिमी) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
मांजरा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०:३० वाजता धरणाचे गेट क्रमांक १ आणि ६ हे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणाचे एकूण ६ दरवाजे सुरू असून, त्यातून मांजरा नदीपात्रात २०१५७.७७ क्युसेक (५७०.८८ क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात येणा-या पाण्याच्या पातळीनुसार विसर्ग वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच माजलगाव धरणाचेही सोमवारी सकाळी ११ वाजता ११ दरवाजे ०.५० मीटरने वाढवण्यात आले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|पाणीपुरी खाल्ली आणि १६ जण रुग्णालयात; कंधार हादरला!
01:15
Video thumbnail
Latur|मान्सूनपूर्व कामांचा दावा हवेत; पहिल्याच पावसात लातूर जलमय
02:33
Video thumbnail
Latur Manapa|लातूर मनपा ठप्प! कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका
01:58
Video thumbnail
Udgir Farmer Andolan|हातात नांगर, सरकारविरोधात एल्गार; उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा सत्याग्रह!
03:10
Video thumbnail
Latur|रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात हरंगुळ येथील नागरिक आक्रमक;बांधकाम विभागासमोर अर्धनग्न आंदोलन
02:29
Video thumbnail
Latur Manpa Andolan|दोन महिन्यांपासून पगार नाही; मनपा कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
04:07
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये 'नाते शतजन्माचे'; परिचय संमेलनाला मोठा प्रतिसाद!
03:08
Video thumbnail
Latur|TET पेपरफुटीवर उदगीरमध्ये अभाविपचा एल्गार; सरकारविरोधात जोरदार आंदोलन!
02:30
Video thumbnail
अयोध्या राम मंदिर प्रकरणात दोषींना सोडलं जाणार नाही - केंद्रीय मंत्री चिराग पासवान
01:31
Video thumbnail
Udhav Thakre sabha|परभणीत उद्धव ठाकरेंचा एल्गार; बंडखोरांवर थेट हल्लाबोल!
05:46
Video thumbnail
Hingoli|कृषिमंत्र्याच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
00:57
Video thumbnail
Sanjay Jadhav On Sanjay Raut|"हम तो इतने बेशरम हैं..." म्हणत जाधवांचा राऊतांवर निशाणा
04:28
Video thumbnail
Rain Update|लातूरमध्ये मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग; उकाड्यापासून दिलासा
02:33
Video thumbnail
Latur Railway Update|खासदार शिवाजी काळगे यांचा मोठा दावा; लवकरच नवी लातूर–मुंबई रेल्वे
02:16
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01

Latest news