28.4 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeक्रीडामुंबईवर राजस्थानची ‘यशस्वी’ भरारी

मुंबईवर राजस्थानची ‘यशस्वी’ भरारी

जयपूर : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला दुस-यांदा हरवले. वानखेडे स्टेडियमवर वस्त्रहरण केल्यानंतर आरआरने घरच्या मैदानावरही एमआयला पराभवाची चव चाखवली. आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशाने नेहल वढेरा व तिलक वर्मा यांनी मुंबईला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. संदीप शर्माने ५ विकेट्स घेत मुंबईच्या धावांचा चांगलाच ब्रेक लावला. यशस्वी जैस्वालने आयपीएल २०२४ मधील पहिले शतक झळकावताना लक्ष्याचा पाठलाग करणा-या आरआरच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी दोन सोपे झेल टाकले आणि काही चौकारही सोडले. तेच मुंबईला महागात पडले.

जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल ७४ धावांची भागीदारी केली. पियुष चावलाने अनुभवाच्या जोरावर मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने जॉस बटलरला ३५ ( २५ चेंडू, ६ चौकार) धावांवर बाद करून आरआरला ७४ धावांवर धक्का दिला. यशस्वीने ३१ चेंडूंत यंदाच्या पर्वातील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. पियुषच्या गोलंदाजीवर यशस्वीने उत्तुंग फटका खेचला आणि नेहालला तो टिपता आला असता तर मुंबईला मोठी विकेट मिळाली असती. पण, सीमारेषेवर त्याने झेल टाकला आणि आरआरला षटकार मिळाला. त्यांनी १० षटकांत १ बाद ९५ धावा केल्या होत्या. मोहम्मद नबीकडून टक ला अपेक्षित गोलंदाजी होताना दिसली नाही आणि यशस्वी व संजू सॅमसनने ११ व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले. टीम डेव्हिडने १३ व्या षटकात संजूचा सोपा झेल टाकला. यशस्वी आज भलत्याच फॉर्मात होता आणि त्याने जसप्रीत बुमराह यालाही उत्तुंग षटकार खेचला.

तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ६), इशान किशन ( ०) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना आरआरच्या गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवले. मोहम्मद नबीला ( २३) बाद युझवेंद्र चहलने आयपीएलमधील ऐतिहासिक २०० वी विकेट मिळवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. नेहाल २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला. तिलकने ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या. मुंबईने ९ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. संदीप शर्माने २०व्या षटकात तीन विकेट्स घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR