38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजनहॉलिवूडमध्ये प्रियंकाला करावा लागला संघर्ष

हॉलिवूडमध्ये प्रियंकाला करावा लागला संघर्ष

मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या स्वत:च्या आणि मेहनतीच्या जोरावर जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी देसी गर्ल २०१७ मध्ये हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ‘बेवॉच’ या चित्रपटापासून जगभरात ओळख निर्माण केली. प्रियांका चोप्राला हॉलिवूडमध्ये सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला होता. अलीकडेच तिने हॉलिवूडमध्ये आलेल्या वाईट अनुभवातून स्वत:ला कसे सावरले याबद्दल सांगितले.

हॉलिवूडमधील संघर्षाबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, ही एक अशी इंडस्ट्री होती ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. तिथल्या लोकांना मी ओळखत नव्हतो. पहाटे दोन वाजता फोन करणारे जवळचे मित्र नव्हते. त्यावेळी मला खूप एकटे वाटत असे हा माझ्यासाठी खूप भयानक अनुभव होता. न्यूयॉर्क शहर एक आव्हानात्मक शहर आहे. या शहरातील माज्या आयुष्यातील सुरूवातीलचा काळ अंधकारमय होता, यामुळे मला खुप वेदना झाल्या, असे प्रियांका म्हणाली.

हॉलिवूडमध्ये प्रियंकाला करावे लागले स्ट्रगल

भारतात खुप प्रसिध्द असतानाही प्रियंकाला हॉलिवूडमध्ये पुन्हा नव्याने स्ट्रगल करावे लागले.सुरुवातीला लोकांनी प्रियांकाला भेटण्यासही नकार दिला, हा तिच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र, या कठीण काळातही प्रियंका खंबीरपणे हिंमतीने उभी राहिली आणि स्वत:ला सावरले. प्रियंका सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘हेड्स ऑफ स्टेट’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय गेल्या महिन्यात तिने ‘ब्लफ’ या चित्रपटाचीही घोषणाही केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR