31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्ररजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सातारा लाेकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय ७६) यांचे आज (शुक्रवार) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा (सांरग), सुन (रचनादेवी), नातवंडे असा परिवार आहे अशी माहिती खासदार पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

रजनीदेवी या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज (शुक्रवारी) दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रत्येक कार्यामध्ये अतिशय हिरीरीने भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या रजनीदेवी यांना सर्वजण ‘माई’ या नावाने ओळखत असत. आदर्श संस्कारित आणि एक धार्मिक गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. उच्चशिक्षित असून देखील जुन्या रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR