36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयखासदार राघव चढ्ढा यांचे राज्यसभेतील सदस्यत्व बहाल

खासदार राघव चढ्ढा यांचे राज्यसभेतील सदस्यत्व बहाल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांचे राज्यसभेतील सदस्यत्व सोमवारी बहाल करण्यात आले आहे. त्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले की, भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी मांडलेल्या प्रस्तावावर आप खासदार राघव चड्ढा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीला आप खासदाराच्या निलंबनाची मुदत पुरेशी वाटली. पावसाळी अधिवेशनात ११ ऑगस्ट रोजी चढ्ढा यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते.

समितीच्या अहवालाचा दाखला देत अध्यक्ष म्हणाले की, ११ ऑगस्ट २०२३ पासून सदनाच्या सदस्याचे निलंबन ही पुरेशी शिक्षा आहे, जी न्यायाच्या उद्देशाने काम करते. या अहवालाचा दाखला देत त्यांनी आम आदमी पक्षाचे सदस्य राघव चढ्ढा आत्मपरीक्षण करतील आणि भविष्यात सभागृहाच्या प्रतिष्ठेनुसार आणि परंपरेनुसार वागतील अशी आशा व्यक्त केली. यानंतर भाजपचे जीव्हीएल नरसिंह राव यांनी चड्ढा यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करणारा ठराव मांडला.

निलंबन आदेश मागे घेतल्यावर आप खासदार राघव चढ्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘मला ११ ऑगस्ट रोजी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते. माझे निलंबन मागे घेण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली आणि आता ११५ दिवसांनंतर माझे निलंबन रद्द करण्यात आले आहे. माझे निलंबन मागे घेण्यात आले याचा मला आनंद आहे. मी सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचे आभार मानू इच्छितो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR