रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी

मुंबई : बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंह एका अत्यंत मोठ्या वादात अडकला असून, चित्रपटसृष्टीतील कामगार संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने रणवीर सिंहविरोधात आक्रमक पाऊल उचलत त्याच्यावर बंदी घातली आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित अशा डॉन ३ चित्रपटातून रणवीर सिंहने ऐनवेळी आणि अचानक माघार घेतल्यामुळे संघटनेने हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे.

या बंदीचा अर्थ असा की, आता एफडब्ल्यूआयसीईशी संबंधित असलेला कोणताही कलाकार, तंत्रज्ञ किंवा कामगार रणवीर सिंहसोबत काम करणार नाही. त्यामुळे रणवीर सिंगच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एफडब्ल्यूआयसीईचे मुख्य सल्लागार आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी या संपूर्ण वादाचा वृत्तांत सांगितला. अशोक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद ११ एप्रिल रोजी सुरू झाला. चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते आणि संपूर्ण युनिट परदेशी रवाना होण्यासाठी अवघे ३ आठवडे उरले होते. अशावेळी रणवीर सिंहने अचानक डॉन ३ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मुख्य अभिनेत्यानेच चित्रपटातून हात काढून घेतल्यामुळे निर्मात्यासमोर मोठे संकट उभे राहिले. ११ एप्रिल रोजी चित्रपट निर्माते फरहान अख्तर यांनी अभिनेता रणवीर सिंहविरोधात लेखी तक्रार दाखल केली. रणवीरने ऐनवेळी चित्रपटातून माघार घेतल्याने मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आम्ही हे प्रकरण पुढील कारवाईसाठी अधिकृतपणे एफडब्ल्यूआयसीईकडे सोपवले असे अशोक पंडित यांनी म्हटले.

एक्सेल एंटरटेनमेंटचे कोट्यवधींचे नुकसान
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने डॉन ३ च्या प्री-प्रोडक्शनवर कोटयवधी रुपयांचा खर्च केला होता. रणवीर सिंहच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे निर्मात्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा वाद मिटवण्यासाठी प्रॉड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही बाजूंमधील चर्चा अपयशी ठरली आणि यावर कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नाही. अखेर पाच महिन्यांच्या अंतर्गत बैठकांनंतर कामगार संघटनेने रणवीर सिंहवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

रणवीरच्या कारकिर्दीला मोठ्या ब्रेकची शक्यता
पद्मावत, सिम्बा, बाजीराव मस्तानी, गल्ली बॉय आणि राम-लीला यांसारखे एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणा-या रणवीर सिंहसाठी हा निर्णय अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. जर फिल्म इंडस्ट्रीतील तंत्रज्ञ आणि कामगारांनी रणवीरसोबत काम करण्यास नकार दिला, तर त्याच्या पुढच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्णपणे ठप्प होऊ शकते. आता या संपूर्ण वादावर रणवीर सिंह काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
00:00
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00
Video thumbnail
IAS Rahul Kulkarni|लातूर मनपाला अखेर नवे आयुक्त; राहुल कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार!
02:04
Video thumbnail
Solapur|दुधनी बाजार समितीत चबुतरा वाद पेटला; ५ तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची माघार
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अनधिकृत बॅनर्सविरोधात धडक मोहीम; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश
03:07
Video thumbnail
लोकनेते विलासराव देशमुख यांचा विकासाचा वारसा; लातूरला विभागीय आयुक्तालयाची गरज – आ. अभिमन्यू पवार
01:47
Video thumbnail
LIVE- विधान परिषद पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
02:24:19
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण
01:56:55
Video thumbnail
Nanded|"हिंमत असेल तर समोर या!" नागेश पाटील आष्टीकरांचा विरोधकांना इशारा
04:03
Video thumbnail
Latur|लातूर सिटी बसची पोलखोल! तपासणीत धक्कादायक त्रुटी
03:51
Video thumbnail
Latur|फिल्मी स्टाईल पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
02:19
Video thumbnail
Latur|जून संपला... पण पाऊस नाही! लातूरचा शेतकरी चिंतेत
05:24
Video thumbnail
HSRP NUMBER PLEAT|HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOची कारवाई सुरू
04:51
Video thumbnail
Breaking News|नांदेडमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे; राजकीय वातावरण तापले!
01:26

Latest news