मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिला मार्च महिन्याच्या हप्ताचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी देखील पैसे अद्याप आले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. पण लाडक्या बहिणींना चिंता करण्याचे कारण नाही. कारण लाडकींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे ३००० रुपये एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही महिन्यांचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. पण लकवरच सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थी महिला निकषात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत, ज्यांनी अद्याप केवायसी केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना सरकारने दिलासा दिला आहे. ई-केवायसीसाठी सरकारने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केवायसीमध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत त्यांना सरकारने एक संधी दिली आहे. त्यांनी ३१ एप्रिलच्या आत केवायसी करायची आहे. त्यानंतरच त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा केले जातील.
ई-केवायसी करताना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी चुकीचा पर्याय निवडला. ‘माझ्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का?’ या प्रश्नाचे उत्तर अनेक महिलांनी चुकीचे सबमिट केले. त्यामुळे त्यांचा मासिक हप्ता आपोआप बंद झाला. या सर्व महिलांच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्यांना दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे.

