27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

संभाजीराजे आक्रमक

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि त्यातून आरक्षण मिळाले तर तो ओबीसींवर अन्याय असेल, असे म्हणत त्यांनी ओबीसी महासभा घेतली. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे.

संभाजीराजे यांची फेसबुक पोस्ट
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणे लावण्याचे पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.

सोलापुरात भुजबळांचा निषेध
मंत्री छगन भुजबळ यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरात छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील मालवंडी गावामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केला गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR