26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeमहाराष्ट्रमहानगरपालिकांतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

महानगरपालिकांतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. २९ महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते.

५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या ५० टक्के आरक्षणानुसार, ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले होते. तर १६ जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, याबाबतची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील २९ महापौरपदांसाठी आरक्षण-

अनुसूचित जमाती – १
अनुसूचित जाती – ३
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – ८
सर्वसाधारण – १७

पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सातारा, अहिल्यानगर, धुळे, जळगाव महापालिकांच्यी आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनेक दिग्गजांना धक्का बसला.

अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे.

कोल्हापूर महापालिकेतही महापौर पद हे ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे

. इचलकरंजीमध्येही ओबीसी महापौर असेल

. जळगाव महापालिकेचे महापौरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे.

सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या मालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील महापौर असणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दोन्ही महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे.

अ.क्र. महानगरपालिकेचे नाव आरक्षित प्रवर्ग

1 मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

2  ठाणे – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग

3 नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

4 मीरा भाईंदर – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
5 वसई विरार – खुला प्रवर्ग

6 कल्याण डोंबिवली – ‘एसटी’ अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्ग
7 भिवंडी- निजामपूर – खुला प्रवर्ग
8 उल्हासनगर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग
9 पुणे – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

10 पिंपरी चिंचवड – खुला प्रवर्ग
11 कोल्हापूर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग
12 इचलकरंजी – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग
13 सांगली मिरज कूपवाड – खुला प्रवर्ग
14 सोलापूर – खुला प्रवर्ग
15 छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग

16 लातूर – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
17 जालना – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
18 पनवेल – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग
19 अकोला – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
20 अहिल्यानगर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
21 चंद्रपूर – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
22 जळगाव – ‘ओबीसी’ अर्थात इतर मागास प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
23 अमरावती – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

24 धुळे – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
25 नांदेड वाघाळा – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
26 नागपूर – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
27 नाशिक – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
28 परभणी – खुला प्रवर्ग
29 मालेगाव – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR