27.3 C
Latur
Thursday, June 12, 2025
Homeपरभणीनेसुविच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्रेहमीलन सोहळा रंगला

नेसुविच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्रेहमीलन सोहळा रंगला

मानवत : येथील वैभवशाली इतिहास असलेल्या नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालयातील वर्ग दहावी २००२च्या बॅचचा स्नेहमीलन सोहळा अतिशय दिमाखात रेणुका मंगल कार्यालय या ठिकाणी दि.३ व ४ मे रोजी रंगला. या कार्यक्रमासाठी एकूण १०२ मुले व मुली उपस्थित होते. यावेळी वर्गमित्रांनी एकमेकांची गळाभेट जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमानिमित्त गुरु पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक सिखवाल, भराडिया, नेवरेकर, येलमटे, काकडे, केशव शिंदे, मोरे, पुरी, कुलकर्णी, अशोक काळे, गोविंद सीखवाल, थोंबाळ, मुंदडा, हारकाळ आदी उपस्थित होते.

या वेळी सर्व विद्यार्थ्यांचा अल्पपरिचय व सर्व शिक्षकांचा गुरु पूजनाचा कार्यक्रम साजरा झाला.
या स्नेह मिलन सोहळ्यासाठी सर्व संयोजन समितीने यशस्वीपणे कामकाज पार पाडले. गुरु पूजनाच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्रीमती पुनम वट्टमवार, शशिकांत नेवरेकर आणि विष्णू लाड यांनी केले. शब्दसुमनाने स्वागत श्रीमती स्नेहा लकडे हिने केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ.नीरज दगडू आणि डॉ.माधवी कोकरे यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR