22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीसमसापूर ३३ केव्ही उपकेंद्रामुळे १२ गावांचा वीज प्रश्न मार्गी

समसापूर ३३ केव्ही उपकेंद्रामुळे १२ गावांचा वीज प्रश्न मार्गी

परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील समसापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकें्रदाचा लोकार्पण सोहळा आ. डॉ. राहूल पाटील यांच्या हस्ते पार पडला. समसापूर उपकेंद्र कार्यान्वित झाल्यामुळे परीसरातील १२ गावांचा सुरळीत वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. पुर्वी जास्त अंतरावरून या गावांना वीज पुरवठा होत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्यासह कमी दबाने वीज पुरवठा होण्याने अनेक समस्यांचा सामना शेतक-यांना करावा लागता होता. या त्रासाला कंटाळलेल्या शेतक-यांनी नवीन उपकेंद्र उभारण्यासाठी आ.डॉ. पाटील यांच्याकडे मागणी केली. आ. डॉ. पाटील यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून समसापूर येथे नवीन उपकेंद्र उभारण्यात आले असून यामुळे शेतक-यांत मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी विधानसभा मतदार संघातील समसापूर, धार, मांगणगाव, मटक-हाळा, दुर्डी, मुरूंबा, साटला, धारणगाव, करडगाव, हिंगला, नांदखेडा, सनपुरी व साडेगाव या गावांना पुर्वी दूर अंतरावरील विविध सब स्टेशनमधून वीज पुरवठा करण्यात येत होता. यामुळे शेतक-यांना अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रकार वारंवार घडत होते. तसेच पावसाळ्यात ४- ४ दिवस वरील गावांचा वीज पुरवठा खंडीत राहत होता. उच्च दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने विद्युत मोटारीसह अन्य यंत्रे चालवण्यात अडथळा निर्माण होत होता.

त्यामुळे पाणी असूनही शेतक-यांना पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्युत पुरवठा खंडीत राहत असल्याने पाण्याअभावी पिकांचे नुकसान तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व दैनंदिन व्यवहारात अडथळे निर्माण होत होते. गेल्या अनेक वर्षांच्या त्रासाला कंटाळलेल्या १२ गावातील नागरीकांनी आ. डॉ. पाटील यांच्याकडे वरील गावांसाठी नवीन सबस्टेशन उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेवून आ. डॉ. पाटील यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून समसापूर येथे नवीन ३३ केव्ही केंद्र उभारणीला मंजुरी मिळवली. त्यानंतर तात्काळ समसापूर येथे नवीन उपकेंद्र उभारण्यात आले असून या उपकेंद्राचा लोकार्पंण सोहळा नुकताच आ. डॉ. पाटील यांच्या हस्ते पार पडला.

या लोकार्पण सोहळ्याला युवासेना तालुका प्रमुख संदीप झाडे, कृउबा सदस्य अरविंद देशमुख, गोपीनाथ झाडे, महावितरण अभियंता घोडके, भागवत गरूड, शिवाजी गरूड, बंडू नाना बीडकर, शिवाजी चोपडे, रामकिशन मुळे, संतोष जाधव, दामोधर सानप, किरण डुकरे, ज्ञानदेव चोपडे, रामराव डोंगरे, पंढरी खोडवे, सरपंच आळसे, बाबाराव चोपडे, बंडू राऊत, रमेश चोपडे, अनंता वायवळ, केरबा चोपडे, दगडोबा चोपडे, मुंजाजी चोपडे, जगन्नाथ चोपडे, कुंडीबा चोपडे, रामप्रसाद चोपडे, शेख रहीम, देविदास चोपडे, महावितरणचे पंकज पतंगे, घुगे यांच्यासह परीसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवीन उपकेंद्र उभारल्या बद्दल आ.डॉ. पाटील यांचा भव्य सत्कार करून ग्रामस्थांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR