36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रईडीच्या भीतीपोटी शिंदे म्हणाले होते भाजपसोबत जाऊ

ईडीच्या भीतीपोटी शिंदे म्हणाले होते भाजपसोबत जाऊ

ठाणे : आम्ही शिवसेनेचे लोक १५ जून २०२२ रोजी अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माझ्या रूममध्ये येऊन आपण पंतप्रधान मोदींसोबत सत्तेत गेले पाहिजे, असे आर्जव केले. तुरुंगात जाण्याचे माझे आता वय राहिले नाही. माझ्यामागे ईडी आणि सीबीआय लागली आहे, असे एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या सगळ््यानंतर हे महाशय गद्दारीकरून भाजपसोबत गेले. पण बाळासाहेब ठाकरे सोडा, आनंद दिघेंनाही हे तोंड दाखवू शकणार नाहीत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ठाण्याचे इंडिया-महाविकास आघाडी उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ शिवसेना खासदार संजय राऊत यांची सभा संपन्न झाली. या सभेला शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही संबोधित केले. यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, युवासेनेच्या सहसचिव धनश्री विचारे आधी उपस्थित होते. संजय राऊत यांनी याच सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. गद्दारी करणा-यांना जनता साथ देणार नाही. ४ जूनला एकनाथ शिंदे यांचा खेळ खल्लास झालेला असेल, असे राऊत म्हणाले. ठाणे आणि बारामतीत आपले उमेदवार बहुमतांनी निवडून येतील. तोतया मुख्यमंत्री म्हणून सर्वोच्च न्यायालयाने यांना लाथ मारली आहे. हे (एकनाथ शिंदे) गोधडीत रांगत होते, तेव्हा ठाण्यावर भगवा फडकला होता. खरे म्हणजे ठाण्यातून त्यांनी मुलाला उभे करायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR