21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडचे सपसेल लोटांगण

न्यूझीलंडचे सपसेल लोटांगण

दक्षिण आफ्रिकेचा तब्बल १९० धावांनी मोठा विजय

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील विश्वचषकाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा तब्बल १९० धावांनी दारुण पराभव केला. आफ्रिकेने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी फलंदाजांची दमछाक उडाली. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव ३५.३ षटकात १६७ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने एकाकी झुंज दिली. त्याने ५० चेंडूत ६० धावांची खेळी केली. फिलिप्सचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.

डेवेन कॉनवे २, विल यंग ३३, रचिन रविंद्र ९, डॅरेल मिचेल २४, टॉम लेथम ४, मिचेल शँटनर ७, टीम साऊदी ७, जीमी नीशम ० यांना मोठी खेळी करता आली नाही. या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्को यानसन याने ३ विकेट घेतल्या. त्याशिवाय गेराल्ड कोटजी याने दोन विकेट घेतल्या. तर रबाडाला एक विकेट मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR