24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडासारा तेंडुलकर, शुबमन गिल डीपफेकचे शिकार

सारा तेंडुलकर, शुबमन गिल डीपफेकचे शिकार

मुंबई : ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना तिच्या डीपफेक व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. रश्मिकानंतर कतरिना कैफचाही मॉर्फ फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत अभिनेत्रीला विचित्र कपडे घालण्यात आले होते. आता शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.

दरम्यान, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर डेट करत असल्याच्या चर्चा बराच काळापासून सुरू आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आले होते. आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शुबमन खुर्ची बसलेला दिसत असून सारा त्याच्या गळ्यात हात घालून उभी असल्याचे फोटोत दिसत आहे. एका ट्वीटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून ‘शुबमन गिलला डेट करत असल्याचे साराने कन्फर्म केले आहे’, असं कॅप्शन देण्यात आले आहे.

पण, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा हा फोटो मॉर्फ केलेला आहे. ओरिजिनल फोटोमध्ये साराबरोबर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आहे. साराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन अर्जुनबरोबरचा हा फोटो शेअर केला होता. याबरोबर तिने अन्य काही फोटोही शेअर केले होते. यातील एका फोटोत अर्जुनच्या जागी शुबमनचा फोटो एडिट करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR