27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रससून रुग्णालयातील कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

ससून रुग्णालयातील कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

ललित पाटील प्रकरण

पुणे : ललित पाटील प्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील एका कर्मचा-याला ताब्यात घेऊन अटक केले आहे. ललित पाटील हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला अनेक गोष्टींची मदत करण्यामध्ये या कर्मचा-याचा हात होता.

तसेच तो सतत ललित पाटीलच्या संपर्कात होता. महेंद्र शेवते असे या अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयातील कर्मचा-याचे नाव असून, तो शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता.
ससून रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात शिपाई म्हणून काम करणारा महेंद्र शेवते हा ड्रग माफिया ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यावर शेवतेला अटक करण्यात आली आहे.

शेवते हा जरी शिपाई म्हणून नियुक्त असला तरी, १६ नंबर वॉर्डमधील कैदी आणि ससूनमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यामधे तो दुवा म्हणून काम करत होता. १६ नंबर वॉर्डमधे तो सतत ये-जा करत होता. १६ नंबर वॉर्डमधे काम करणा-या १० ते १२ नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे शेवतेच्या चौकशीतून तो कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटील आणि इतर कैद्यांना मदत करत होता हे समोर येणार आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणातील ही महत्त्वाची घडामोड समजली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR