21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र

आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र

मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणा-या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा निर्णय घेण्यात आला.या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांची पकृती खालावत आहे. मराठा बांधव आत्महत्या करत आहेत. तरीही राज्य सरकार मात्र केवळ बैठकांच्या खेळात मग्न असल्याची टीका संभाजीराजे यांनी केली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते. मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाले व समाजाचा लढा परत एकदा तीव्र झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR