मराठवाड्यात शिंदेसेना बॅकफुटवर

छत्रपती संभाजीनगर/ नांदेड : छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नांदेडमध्ये पण भाजपने मोठी मुसंडी मारली. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे अस्तित्वच पणाला लागल्याचे दिसत आहे. तर ठाकरेंच्या सेनेचा मराठवाड्याचा गड चढतानाच श्वास फुलला. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र चांगलीच बॅकफुटवर गेली आहे.

मनसेची अवस्थाही यापेक्षा वाईट आहे. पण भाजपविरोधात ज्या मित्र पक्षाने शड्डू ठोकले, त्याची पण मोठी दयनीय अवस्था झाल्याचे दिसते. त्यामुळे एकीकडे विरोधकांचा बंदोबस्त करतानाच भाजपने मित्र पक्षाला अस्मान दाखवल्याचे बोलले जात आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ८ वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाला अवघ्या ६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेड महापालिकेची पहिलीच निवडणूक चर्चेत आली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्याविरोधात विरोधक आणि मित्रही सक्रिय झाले होते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असल्याचे म्हटले जात होते. पण याठिकाणी भाजपने मोठी आघाडी घेतली.

नांदेड महानगरपालिकामध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्तेकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत ८१ पैकी ४३ जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. आता बहुमताचा आणि सत्ता स्थापनेचा आकडा गाठणे भाजपला सोपे झाले आहे. या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना मोठा करिष्मा करण्याची शक्यता वाटत होती. तर काँग्रेसही अनेकांचे टांगे फरार करण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण याठिकाणी भाजपने सर्वांचेच गणित विस्कटून टाकले.

शिंदेसेनेची कोरी पाटी
या निवडणूकीत सर्वात मोठा फटका बसला तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. राज्यातील इतर महापालिका प्रमाणे इथे शिंदेसेनेला थोडीही चांगली कामगिरी बजावता आली नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार शिंदे सेनेचे इथे अद्याप खातेही उघडलेले नाही. शिंदे शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील यांनी मोठा धक्का मानल्या जात आहे. विरोधकांसह भाजपने इथे मित्रपक्षाला औषधालाही ठेवले नसल्याची चर्चा रंगली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला झटका
छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरेपर्यंत एकमेकांच्या गळयात गळे घालणारे भाजप आणि शिंदेसेनेने युती तुटल्याचे जाहीर केले. ऐनवेळी दोघांनाही उमेदवार उभे केले. त्यामुळे ही दोन्ही पक्षांची खेळी मानल्या जात होती. पण या निकालाचे आकडे समोर आल्यावर वेगळेच चित्र दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या ११५ जागांपैकी भाजपच्या पारड्यात ५६ जागा आल्या आहेत. अजून निकाल हाती येण्याची शक्यता आहे. महापौर पदासाठी ५८ जागांचे गणित आहे. त्यामुळे इथेही भाजपला एकहाती सत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इथे कोणत्याही पक्षाचा टेकू घेण्याची कदाचित भाजपला गरज पडू शकत नाही.

एमआयएम शिंदे गटापेक्षा सरस
सध्याची जी आकडेवारी समोर येत आहे, त्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने मित्रपक्षाला ही अस्मान दाखवल्याचे दिसून येत आहे. महापालिकेत गेल्यावेळी प्रमाणेच एमआयएमने मोठी मुसंडी मारल्याचे दिसते. गेल्यावेळी एमआयएमचे २५ उमेदवार निवडून आले होते. तर सध्या त्यांचे २४ उमेदवार विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. या ठिकाणी उद्धव सेनेला अवघ्या ६ जागांवर विजय मिळला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आता शिंदे सेना महापालिकेत विरोधी बाकांवर बसणार का? याची चर्चा रंगली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news