37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार

शिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे बारामतीतून अजित पवारांना आव्हान देण्यासाठी अद्यापही ठाम आहेत. त्यातच आज त्यांनी आणखी एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. आपण भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या प्रस्तावाची महायुती कशी दखल घेते हे पाहणे गरजेचे आहे.

विजय शिवतारे यांनी सांगितले की, महायुतीला विनंती करुन जर शिवसेनेने बारामतीची जागा मिळवली तर धनुष्यबाण या चिन्हावर आपण ही निवडणूक जिंकू शकतो. गेल्या काही दिवसांत मी मतदारसंघात फिरल्यानंतर लोकांमध्ये अंडर करंट काय आहे, हे मला जाणवले आहे त्याची माहिती मी वरिष्ठांना दिली आहे. त्यामुळे माझ्यामध्येही एक आत्मविश्वास आला आहे. मुळात गेल्या दहा-वीस वर्षात बारामतीची जागा महायुतीत भाजपची राहिली आहे. त्यामुळे अगदीच गरज पडली तर मी भाजपच्या कमळ या चिन्हावरही बारामातीतून लढवण्यास माझी हरकत नाही. दोन दिवस मी जे विचारमंथन केले आहे लोकांशी बोललो आहे त्यावरुन या निर्णयापर्यंत पोहोचलो आहे.

अपक्ष हे नंतरचा भाग आला पण कदाचित महायुतीतून अशा पद्धतीने जर निर्णय झाले तर ते खूपच सोईस्कर होतील. त्यामुळे जर निवडून येण्याच्या मेरिटचा विचार केला तर मोदींना पुन्हा तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी एक एक खासदार निवडून येणे महत्वाचे आहे. त्यामुळं अपक्ष लढण्याऐवजी मी हा देखील ऑप्शन त्यांना दिला आहे. मी याबाबत भाजपच्या नेत्यांशी ही चर्चा केलेली नाही. पण माझे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केलेली आहे, असेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR