35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्या२-जी घोटाळ्यातील नेते अडचणीत येणार

२-जी घोटाळ्यातील नेते अडचणीत येणार

नवी दिल्ली : बहुचर्चित 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची बंद झालेली फाईल आता पुन्हा उघडण्याची चिन्ह आहेत. कारण सीबीआयने यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली असून दिल्ली हायकोर्टाने या याचिकेवर सुनावणी करण्यास होकार दिला आहे. यामुळे या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी म्हटले की, रेकॉर्डवर आलेली सामग्री आणि पक्षकारांच्या वकिलांच्या युक्तीवादाच्या आधारे सीबीआयकडून महत्वाचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच अपिलावर विस्ताराने सुनावणीची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे. खंडपीठाने याचबरोबर अपिलाला परवानगी दिली आहे. तसेच हे प्रकरण मे महिन्यात सुनावणीसाठी सुचीबद्ध करण्याचे निर्देश दिले.

सीबीआयने कनिष्ठ कोर्टाच्या निकालावरील गुण-दोषांच्या आधारे विचार करण्यासाठी सन २०१८ मध्ये अपील केले होते. या प्रकरणी न्यायमूर्तींनी गेल्या १४ मार्चला आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. विशेष कोर्टाने २१ डिसेंबर २०१७ रोजी ए. राजा, कनिमोळी आणि इतर दोघांना टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR