36 C
Latur
Wednesday, March 25, 2026
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वत्तसंस्था
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांना या रुग्णालयात आणले गेलं. डॉक्टरांचे एक पथक सोनिया गांधींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वीही अशाच पद्धतीने सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सोनिया गांधींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मंगळवारी रात्री १ च्या नंतर सोनिया गांधी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना छातीत त्रास जाणवू लागला आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. अनुप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही पोहचले रुग्णालयात
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी हे दोघंही तातडीने सर गंगाराम रुग्णालयात पोहोचले. प्रियंका गांधी सध्या आई सोनिया गांधींसह रुग्णालयातच उपस्थित आहेत. त्या सध्या रुग्णालयातच असून डॉक्टरांकडून वेळोवेळी प्रकृतीचा आढावा घेत आहेत. तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR