नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लॉर्डस् येथील पहिला सामना संपल्यानंतर झालेल्या एका लाजिरवाण्या ‘नाईट क्लब’ वादामुळे इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि पहिल्या सामन्यात चमकलेला वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन या दोघांना संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे.
ईसीबीने न्यूझिलंडविरुद्धच्या आगामी दुस-या कसोटी सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेसोबतच इंग्लंड क्रिकेटमध्ये एक मोठा भूकंप झाला आहे. लॉर्डस् येथील पहिला सामना संपल्यानंतर झालेल्या एका लाजिरवाण्या ‘नाईट क्लब’ वादामुळे इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि पहिल्या सामन्यात चमकलेला वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन या दोघांना संघातून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे.
आता संघाची धुरा अनुभवी खेळाडू जो रूट याच्याकडे कार्यवाहक कर्णधार म्हणून सोपवण्यात आली आहे.
७ जून रोजी लॉर्डस् कसोटी लवकर संपल्यानंतर बेन स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन हे लंडनमधील चेल्सी येथील एका नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे मध्यरात्री झालेल्या एका हाणामारीच्या घटनेत हे दोन्ही खेळाडू सामील असल्याचे समोर आले आहे. ईसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संघ शिस्त आणि कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही खेळाडूंची चौकशी सुरू केली आहे. या वादामुळे बेन स्टोक्सच्या कर्णधारपदासह त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर ‘फुल स्टॉप’ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















