दुहेरी धक्क्यानंतर सूर्यकुमार यादवची इन्स्टा पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला असून भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदावरून सूर्यकुमार यादवला हटवण्यात आले. त्याच्याजागी श्रेयस अय्यर संघाचा नवा कर्णधार झाला. कॅप्टन्सीवरून हटवल्यामुळे आणि इंग्लंड-आयर्लंड दौ-यासाठीच्या संघातून वगळल्यामुळे स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अधिकच चर्चेत आला. बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावरून हटवण्याच्या धक्कादायक निर्णय तर घेतलाच, पण त्यासोबतच संघातूनही बाहेर केले. या सा-या प्रकारानंतर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

२०२६ च्या टी२० विश्वचषकात भारताला विजय मिळवून देऊनही, सूर्यकुमार यादवने केवळ कर्णधारपदच गमावले नाही, तर आगामी मालिकेसाठीच्या संघातही त्याचा समावेश नाही. यादरम्यान, बीसीसीआयने नवीन संघ निवडल्यानंतर सूर्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. त्याने बीसीसीआयने जाहीर केलेला फोटो शेअर केला आणि लिहिले, “या अत्यंत सक्षम दमदार गटाला पुढील आव्हानांसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

दुसरीकडे, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सूर्यकुमार यादवला वगळण्याच्या निर्णयाबद्दल एका पत्रकार परिषदेत सांगितले, सूर्याच्या बाबतीत हा एक कठीण निर्णय होता. त्याचा फॉर्म आणि पुढील दोन वर्षांचे चक्र लक्षात घेता, आम्हाला वाटले की हाच सर्वोत्तम मार्ग असू शकतो. कारण श्रेयस अय्यर हा कर्णधार म्हणून निवडीसाठी पूर्णपणे पात्र आहे.

सूर्यकुमार यादवची आकडेवारी
सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने एकूण ५२ सामने खेळले, त्यापैकी ४२ सामने जिंकले. विशेष म्हणजे, भारताने त्याच्या कर्णधारपदाखाली एकूण नऊ द्विपक्षीय मालिका खेळल्या आणि त्या सर्व जिंकल्या. इतकेच नाही, तर त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने एकही सामना न हरता आशिया कप ट्रॉफी जिंकली. त्याच्या कर्णधारपदाखाली त्यांनी टी-२० विश्वचषक विजेतेपदही राखले. तथापि, या काळात तो फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे बीसीसीआयला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42
Video thumbnail
'प्रति पंढरपूर' वांजरवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त जनसागर; दर्शनासाठी अर्धा किलोमीटरच्या रांगा
03:23
Video thumbnail
"26 दिवस उपोषणानंतरही माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार?" – सोनम वांगचुक यांचा संतप्त सवाल
03:11
Video thumbnail
Amit Deshmukh|सरकारनं चर्चेला उशीर केला; देशाचे सगळे स्तंभ ढासळतायत - आ.अमित देशमुख
04:59
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी आणि लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचा ‘रॅप सॉंग’ आंदोलन
02:21
Video thumbnail
Latur|क्षयरोगमुक्त गावासाठी मोठी मोहीम; वडवळ नागनाथमध्ये विशेष निक्षय शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या दर्शनासाठी १२०० भाविकांची मोफत वारी; २५ बसने पंढरपूरकडे रवाना!
02:11
Video thumbnail
Latur|लातुरात विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; पाहा आनंदवारीचा जल्लोष!
04:04
Video thumbnail
PM Narendra Modi On NEET Pepar Leak|नीट पेपर फुटी प्रकरणात नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
02:56
Video thumbnail
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा बंद; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
06:32
Video thumbnail
Parbhani|लाठीहल्ल्याचा निषेध, परभणी बंद; बाजारपेठेत शुकशुकाट!
02:08

Latest news