27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसोलापूरमतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

दक्षिण सोलापूर : ७ मे रोजी लोकसभेसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी विठुल उदमले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक वेगळेपणाने कशी करता येईल याकरिता प्रशासनाचे विशेष लक्ष दिले आहे. याचबरोबर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदा तीव्र उन्हाळ्यामध्येच या निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्यामुळे मतदारांना सोयीसुविधा पुरवण्याकडेही लक्ष देण्यात आले आहे. मतदारांसाठी सावली, पिण्याचे पाणी, ओ आर एस, वैद्यकीय पथक, दिव्यांगांसाठी व्हील चेअर्स आदि सुविधा प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दक्षिण मतदारसंघांमध्ये ३५७ मतदान केंद्रे आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख ५६ हजार ०२७ इतकी असून १ लाख ८४ हजार ८२४ हे पुरुष मतदार आहेत तर त्री मतदारांची संख्या १ लाख ७१ हजार १६७ इतकी आहे. आणि ३६ मतदार हे इतर आहेत. जेथे पाच आणि पाच पेक्षा जास्त बुध तिथे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. येथील स्वयंसेवकांना पांढरे टी शर्ट देण्यात येणार आहेत. पिंक बुथ, या बुथवर सर्व महिला कर्मचारी राहणार आहेत. सोनी कॉलेज, वसुंधरा महाविद्यालय येथील हे दोन पिंक बुथ राहणार आहे. दिव्यांग मतदान केंद्र आयटीआय कॉलेजला ठेवण्यात आले आहे.

मॉडेल पोलिंग युथ शिवदारे कॉलेज, भारती विद्यापिठ याठिकाणी करण्यात आले आहे. युथ पोलिंग बुथ नवजिवन इंग्लिश स्कुल आणि पंचशील विद्यालय मजरेवाडी येथे करण्यात आले आहे. युवा मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी हे युवा राहणार आहेत. पडदा मशिन मतदान केंद्रांची संख्या २१ आहे. मुस्लिम बाहुल भागात ही मतदान केंद्रे राहणार आहेत. या मतदान केंद्रावर महिला कर्मचारी राहणार आहेत. अशा नवनवीन संकल्पनांचा वापर करून हा लोकशाहीचा उत्सव अधिक प्रभावी करून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उदमले यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये २४४ सैनिक मतदार आहेत. या मतदारांना प्राँक्सी व्होट प्रक्रियेद्वारे मतदान करता येते. संबंधित सैनिकाने त्यांनी अधिकार दिलेल्या व्यक्तीला हे मतदान करता येईल. अशा व्यक्तीने मतदान करणाऱ्या प्रॉक्सी व्होटरना मधल्या बोटाला शाई लावण्यात येईल. दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये २०२१ इडीसी मतदार आहेत, की जे मतदार निवडणूक कार्यक्रमाच्या कर्तव्यावर असल्यामुळे मतदानादिवशी आपल्या गावी जाऊन मतदान करू शकत नाहीत, अशा मतदारांना उपलब्ध असलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR