33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरदूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करा

दूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करा

पंढरपूर : सध्या दुधाचे उत्पादन व मागणी यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे दुधामध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ केली जात आहे. अशी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी सोलापूर जिल्ह्याचे अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दूध हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक आहे. जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत, निरोगी तसेच आजारी, सर्वजण खात्रीचे पोषण म्हणून दूध वापरत असतो. परंतु गेली. अनेक वर्षे दुधाचे उत्पादन व मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे विविध सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. तरीही ही मागणी पुरवण्यासाठी दूध उत्पादक विविध प्रकारची भेसळ करून ही मागणी पूर्ण करत आहेत,ज्यामध्ये आरोग्यासाठी हानिकारक अशा रसायनांचाही वापर होतो, हे दिसून आले आहे.

वारंवार मागणी करूनही प्रशासन या महत्त्वाच्या व नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रश्नाकडे गांभीयनि लक्ष देत नाही,हे लक्षात आल्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने संपूर्ण देशामध्ये दूध भेसळी विरोधात जनआंदोलन उभे करायचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाचे अधिकारी यांना निवेदन देऊन याची सुरवात करण्यात आली आहे.

त्याद्वारे ही भेसळ रोखण्यासाठी तालुका स्तरावर मोफत किंवा अत्यल्प फी घेऊन तपासणी प्रयोगशाळा असाव्यात, तसेच मोबाईल व्हॅनद्वारे अन्न भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची व्यवस्था करावी, जिल्हा स्तरावर अन्न भेसळ रोखणारी समिती गठीत करून त्यामध्ये ग्राहक पंचायतीच्या कार्यकत्यांचा समावेश करावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल, प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा सचिव सुहास निकते यांनी केली आहे.दूध भेसळ हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात यावा, ज्या भागामध्ये अशी भेसळ मोठ्या प्रमाणात आढळते, त्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, त्याच प्रकारे दुधातील भेसळ ओळखण्यासाठी तयार केलेल्या किटला अनुदान देऊन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR