30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeधाराशिवरुग्णवाहिका वेळेवर न आल्याने चिमुकल्याने जीव गमावला

रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने चिमुकल्याने जीव गमावला

भूम : शहरातील हर्षद पांढरे वय ६ वर्ष या मुलाला १ तास १०८ रुग्णवाहिका सेवा तातडीने न मिळाल्याने वेळेत उपचार घेता न आल्याने जीव गमवावा लागला आहे. शहरातील शिवाजी नगर या भागातील हर्षद पांढरे हा रहिवाशी आहे.

१ मे असल्याने शाळेत जाऊन परीक्षेचा निकाल हाती घेऊन सुट्या लागल्याने आनंदाने उड्या मारत घराकडे आला. निकाल आई बाबांच्या हाती देऊन खेळण्यासाठी बाहेर गेला. परंतु नियतीला काही दुसरेच करायचे होते. हर्षद बाहेर खेळत असताना घशाला कात्री लागली. कात्री लागताच हर्षद मोठ्याने रडू लागला हे पाहताच हर्षद च्या आईने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता येथे डॉक्टरांनी पाहणी करून तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला. हर्षदचे आई वडील रोजंदारी करून घर भागवत असल्याने त्याची आर्थिक परस्थिती बेताची आहे. यामुळे त्यांनी मोठ्या आशेने ग्रामीण रुग्णालयात हर्षदला पुढील उपचार घेण्यासाठी नेले. येथे गेल्यानंतर येथील डॉक्टरांनी पाहणी केली व पुढील उपचार घेण्यासाठी रेफर केले. हर्षदला गळ्याला लागल्याने श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. यामुळे रुग्णालयात श्वासनलिका लावण्यात आली होती. परंतु दुस-या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी १०८ या रुग्णवाहिकेची गरज हर्षद ला होती.

कारण रुग्णवाहिकेत श्वासनलिका उपलब्ध होती. यामुळे तातडीने उपस्थित नागरिकांनी १०८ हेल्प लाईन सेवेला संपर्क केला. परंतु १ तास झाला तरी रुग्णालयात १०८ उभी असताना देखील त्यावरील कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने. हर्षद ला पुढील उपचार मिळत नसल्याने हर्षद तडपडत होता. १०८ सेवा मिळण्यासाठी उपस्थित नागरिक रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना विनवणी करत होते. परंतु आमच्या हातात १०८ सेवा देण्याचे कसलेच अधिकार नाहीत असे सांगून डॉक्टर यांनी हात झटकले परंतु रुग्णवाहिकेवर जाण्याची तसदी घेतली नाही. ज्या वेळेस वरतून फोन येईल त्या वेळेसच तुम्हाला सेवा मिळेल असे सांगितल्याने पोराचा जीव ताग्मगत असल्याने हर्षदचे वडील यांनी खाजगी गाडी करून उपचार घेण्यासाठी नेहण्याचा निर्णय घेतला. बार्शी येथील खासगी रुग्णालयात पोहचण्याधीच पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने हर्षद ने वाटेतच जीव गेला. ही वार्ता कळताच पांढरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने शिवाजी नगर भागा सह शहरातील नागरिक हळ हळ व्यक्त करत होते.

कामचुकार कर्मचा-यांवर कारवाई करा
१०८ रुग्णवाहिकेवरील कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांना तातडीने सेवा द्यायची नसेल तर अशा डॉक्टरांनी रुग्णालयात काम करू नये. डॉक्टरांना रुग्णांचा जीव वाचवायचा नसेल तर कर्मचारी व साधना अभावी जीव घेऊ तरी नये. अशा काम चुकार कर्मचा-यांवर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी रुग्णालयात उपस्थित नागरिक करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR