36.9 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाविश्वचषकासाठी टीम इंडिया तयार

विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार

कोलकाता : टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट झालाय. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह यांना स्थान मिळाले आहे. शिवम दुबे पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहे. शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

एक जूनपासून टी 20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे.

ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये टॉप 5 फलंदाजांमध्ये आहेत. त्याशिवाय दुबे यालाही संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.

फलंदाज – 4
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,

अष्टपैलू – 4
हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे,

विकेटकीपर – 2
ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर),

फिरकीपटू -2
कुलदीप यादव, युजवेंद्र चहल ,

वेगवान गोलंदाज – ३
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू –
शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR