मियावली : भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद पोसत असताना आता त्याच देशाला दहशतवाद पोखरू लागला असून आज पाकिस्तान हवाई दलाच्या एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. आत्मघातकी हल्लेखोरांनी पंजाबच्या मियावलीतील हवाई तळावर घुसखोरी केली असल्याची माहिती मिळाली. दोन्ही बाजुने जबरदस्त फायरिंग सुरु झाली होती.
हवाई दलावर हल्ला झाला असून घातक शस्त्रास्त्रे घेऊन दहशतवादी घुसले आहेत. याचा व्हीडीओही समोर आला आहे. एअरबेसच्या आत प्रचंड आग आणि धुर दिसला. आत्मघातकी हल्लेखोर शिडीवरून तिथे घुसले आणि त्यानंतर त्यांनी हल्ला सुरू केला. एकामागोमाग एक असे अनेक बॉम्बस्फोटाचे आवाजही ऐकायला आले. याबाबत पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. दरम्यान, चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे स्थानिक मीडियाने म्हटले आहे. मियांवली या एअरबेसवर इम्रान खानच्या पक्षाच्या समर्थकांनी खानला जेव्हा अटक झालेली तेव्हा हल्ला केला होता. या आंदोलकांनी तेव्हा एका विमानाच्या संरचनेला देखील आग लावली होती.