27.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeसोलापूरमाढ्याची लढाई बबनदादा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची

माढ्याची लढाई बबनदादा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची

रणजीत जोशी
सोलापूर: माढा लोकसभेची लढाई आ. बबनराव शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असून त्यांचे चिरंजीव रणजितंिसह शिंदे यांच्याकडे धुरा आहे. तर मोहिते-पाटलांनी आपल्या समर्थकांवर भिस्त ठेवून अस्तित्वासाठी प्रचारात उतरले आहेत. याशिवाय सावंत बंधू आणि माजी आमदार धनाजी साठे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

माढा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील व रमेश बारसकर यांचे प्रामुख्याने अर्ज दाखल झालेले आहेत. परंतु माढा विधानसभेमधून खरी लढत ही रणजितसिंह निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या येथून आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र तथा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे हे महायुतीचे उमेदवार रणजितसिंंह नाईक निंबाळकर यांना सोबत घेऊन गावोगावी कॉर्नर सभा घेत आहेत. तर संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाटणेकर, भारत पाटील हेदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत गावोगावी जाऊन पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेत आहेत. नुकतेच मोडनिंब येथे शरद पवारांची सभा झाली. या सभेला अनेक नेते उपस्थित होते.

माढा विधानसभा मतदारसंघात माढ्याच्या ८२, पंढरपूरच्या ४२ तर माळशिरसच्या १४ गावांचा समावेश-माढा विधानसभा मतदारसंघात १३८ गावांपैकी पंढरपूर व माळशिरसमधील एकूण ५६ गावांचा समावेश असल्याने तेथून कोणत्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार यावर माढ्याच्या लीडचे भवितव्य अवलंबून आहे.

माढ्यात राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात असणारे पण सध्या महायुतीतच कार्यरत असलेले आ. बबनराव शिंदे यांचा गट व शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा गट लोकसभा निवडणुकीत एकत्र आला आहे. या अगोदरही सन २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून उभारण्यासाठी चाचपणी करीत असताना हे दोघेजण एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर प्रथमच ते या निमित्ताने एकत्र आले आहेत.माढा लोकसभेसाठी मोहिते पाटलांच्या बंडखोरीमुळे समीकरणे बदलली आहेत.मात्र आगामी विधानसभेची समीकरणे लोकसभेच्या निकालावर अवलंबून असल्याने सगळे नेते जोर लावत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR