महायुती सरकार संकटातील बळीराजाच्या पाठीशी

परभणी : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतक-यांना वा-यावर न सोडता महायुती सरकार खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात बोलताना दिली.

परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडीयम मैदानावर रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्यास उपस्थित शेतकरी व युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव, आ. हिकमतदादा उडान, आ. सईद खान, माजी खा. ऍड. सुरेश जाधव, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. हरीभाऊ लहाने, परभणीचे माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख, जिल्हाप्रमुख विशाल कदम, आनंद भरोसे, गंगाप्रसाद आनेराव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्याला असलेली गर्दी जमवलेली किंवा भाड्याची नसून मनापासून उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, भाऊ व शेतक-यांची गर्दी आहे. महायुती सरकारने प्रत्येकाच्या नावापुढे आईचे नाव लिहीण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्राप्रमाणे राज्याने शेतक-यांना ६ हजार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमाफी योजनेचा १२ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी व युवकांच्या हिताच्या योजना प्राधान्याने सुरू राहतील. महायुती सरकार सदैव शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणारे असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

खा. संजय जाधव यांच्या मागणीनुसार परभणीत नवीन एमआयडीसी सुरू करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात येतील. केवळ महानगरांचा नव्हे तर चांदा ते बांदा पर्यंतचा विकास करण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. शेतक-यांना केवळ कर्जमाफी देऊन सरकार थांबणार नाही, तर त्यांना जोड उद्योग करण्यासाठी संधी देणार आहे. त्यासाठी परभणीत १.५ हजार कोटींची लवकरच गुंतवणूक करण्यात येईल. राजकारण करताना विकासाचा अजेंडा पाहिजे. विरोधात राहून विकास साधता येत नाही. त्यामुळे खा. संजय जाधव यांनी परभणीकरांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ख-या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकासाच्या या लढ्यात खा. जाधव यांच्या पाठीशी राहून परभणीकरांना रस्ते, गटार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करील असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव यांनी मेळाव्यास उपस्थित शेतकरी व युवकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला लाडक्या बहिणी, युवक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही
शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण समारोपाकडे वाटचाल करत असताना अचानक माईकचा आवाज बंद झाला. त्यानंतर थोड्यावेळाने प्रयत्न केल्यानंतर माईक सुरू झाला. परंतू पुन्हा काही वेळातच माईक बंद झाला. त्यानंतर पुन्हा माईक सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही असा मिष्कील टोमना लगावला.

कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात नाही
परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळावा रद्द करण्यात यावा असे आवाहन मराठा समाज आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी समाज माध्यमातून केले होते. परंतू या मेळाव्याची तारीख २ महिन्यांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा मेळावा शेतकरी व युवकांच्या विकासासाठी आयोजित केला होता. मेळावा रद्द झाला असता तर दुरवरून आलेल्या शेतकरी व युवकांना त्रास झाला असता. आपण कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात नसल्याचे सांगत विकासाच्या लढ्यात सर्वांच्या सोबत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news