31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरअत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सक्षम सरकारची गरज

अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सक्षम सरकारची गरज

- महीलाचे संरक्षण आणि प्रगतीसाठी संधी देणारे सरकार हवे - टवेन्टिवन अ‍ॅग्रोच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख

लातुर: प्रतिनिधी 

राज्यातील आणि देशातील महिला या सरकारच्या काळात असुरक्षीत आहेत. महिला,
महाविद्यालयीन युवतीवर अत्याचाराच्या घटना दिवसेदिवस वाढत आहेत. या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सक्षम सरकारची गरज आहे. महीलाचे संरक्षण आणि प्रगतीसाठी संधी देणारे सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांना मतदान देऊन विजयी करावे, असे आवाहन टवेन्टीवन शुगर्स ली.च्या संचालीका सौ अदिती अमित देशमुख यांनी केले.

लातूर तालुक्यातील हरंगूळ खुर्द येथे डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धनराज पाटील यांच्या निवासस्थानी २८ एप्रिल रोजी सोमवारी सकाळी महिला सुसंवाद बैठक आयोजीत
करण्यात आली होती, या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीस सौ. अदिती अमित देशमुख यांच्यासह माजी महापौर सौ. स्मिता खानापूरे, डॉ. सविता काळगे, माजी जि.प.सदस्य सोनाली थोरमोटे, संचालीका सपना किसवे, संगीता मोळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना टवेन्टीवन शुगर्स ली.च्या संचालीका सौ अदिती अमित देशमुख म्हणाल्या, ग्रामिण भागातील शेतकरी, महीला, बेरोजगार युवक यांची परि‍स्थिती बिकट झाली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी कमी करून रोजागर निर्मीती करण्यात सरकार अपयशी ठरले आहे असे सांगून महीलाचे संरक्षण, युवकांना रोजगार, सर्व क्षेत्रात प्रगतीसाठी युवतींना संधी देणारे सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांना मतदान देऊन विजयी करावे, असे आवाहन टवेन्टीवन शुगर्स ली.च्या संचालीका सौ अदिती अमित देशमुख यांनी केले.

यावेळी श्रीदेवी झुंजे, सुकुमार गावकरे, सरूबाई झुंजे, वना पवार, शोभा झुंजे, रमा स्वामी, स्वाती शिंदे, फातिमा शेख, शेळके, धूत, जानका पांचाळ, राजाबाई झुंज आदी महीलांसह धनराज पाटील, आनंद पवार, मनोहर झुंजे, उमाकांत झुंजे, श्रीकांत भुजबळ, युवराज बिडवे, बंडू पवार, दत्ता झुंजे, अनिल
स्वामी, सोमनाथ झुंजे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR