Homeमनोरंजनजगविख्यात गायक ‘आशा’जींचे ‘प्ले बॅक’ जीवन

जगविख्यात गायक ‘आशा’जींचे ‘प्ले बॅक’ जीवन

मुंबई/लातूर : आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील गाण्यांमध्ये आपल्या मधुर आवाजाची जादू पसरवली. त्यांच्या आवाजातील गोडवा इतका होता की तो अजूनही लोकांच्या हृदयावर राज्य करतो. आशा भोसले यांच्यासाठी संगीताचा प्रवास तितका सोपा नव्हता, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. फक्त ९ वर्षांच्या असताना त्यांनी त्यांचे वडील गमावल्यानंतर जगविख्यात गायिका म्हणून नावलौकिक मिळविणा-या आशा भोसलेंचा ‘प्ले बॅक सिंगिंग’ मागचा प्रवास कसा होता.

जेव्हा आशा भोसले १६ व्या वर्षी पळून गेल्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लता मंगेशकर यांचे सचिव गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले, तेव्हा लता यांनी त्यांच्या बहिणीशी असलेले संबंध तोडले. लग्नानंतर आशा भोसले यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आणि त्या घरगुती हिंसाचारालाही बळी पडल्या. इतकेच नाही तर त्या आयुष्यापासून इतक्या निराश झाल्या होत्या की त्यांना आत्महत्या करावीशी वाटली. तथापि, १४ हून अधिक भाषांमध्ये गाणी गायलेल्या आशा भोसले यांच्या आवाजात वेगळेच आकर्षण आणि जादू होती. मात्र एक काळ असा होता जेव्हा त्यांना त्यांच्या वाईट आवाजामुळे रेकॉर्डिंग स्टुडिओमधून हाकलून लावण्यात आले होते. दरम्यान त्यांनी त्यांची बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाणे सुरू केले.

आशा भोसले यांनी १९४९ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी पळून जाऊन ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. गणपतराव लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते. लहान वयात माझ्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी झाले. तो प्रेमविवाह होता आणि लता दीदी माझ्याशी बराच काळ बोलल्या नाहीत. त्यांना हे नाते मान्य नव्हते. गणपतरावांचे कुटुंब खूप रूढीवादी होते आणि ते एका गायन स्टारला सून म्हणून स्वीकारू शकत नव्हते. त्यांना तीन मुले होती. २ मुलगे आणि एक मुलगी. तथापि, लग्नाच्या ११ वर्षांनी, म्हणजे १९६० मध्ये, ते वेगळे झाले.

आशांना आत्महत्या करायची होती
पुस्तकानुसार, जेव्हा आशा भोसले तिस-या मुलासाठी गर्भवती होत्या, तेव्हा सासरच्यांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि याच वेळी आशांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुस्तकात आशा म्हणाल्या आहेत- एके ठिकाणी मला स्वत:चा जीव घ्यावासा वाटला. मी आजारी होते, चार महिन्यांची गर्भवती होती, हॉस्पिटलमधील परिस्थिती अशी होती की ते नरकासारखे वाटत होते.

१९८० मध्ये आरडी बर्मन यांच्याशी दुसरे लग्न
आशा भोसले यांनी १९८० मध्ये संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले. दोघांची पहिली भेट १९६६ मध्ये ‘तीसरी मंजिल’ या चित्रपटातील एका गाण्यादरम्यान झाली. त्यानंतर आशा भोसले यांनी आर.डी. बर्मन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली.

कढाई मटण आणि बिर्याणीचे अनेक चाहते
आशा भोसले यांचा आवाज जितका मंत्रमुग्ध करणारा आहे तितक्याच त्या जेवण छान बनवतात. आशा भोसले यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे, अनेक सेलिब्रिटी त्यांच्या हाताने बनवलेले कढई मटण आणि बिर्याणीचे चाहते आहेत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना आशा भोसले यांनी बनवलेले जेवण खूप आवडायचे. एका मुलाखतीदरम्यान आशा भोसले म्हणाल्या होत्या की ऋषी कपूर यांना त्यांचे हाताने बनवलेले शमी कबाब, कढई मटण आणि काळी डाळ खूप आवडायची.

मुलांसाठी स्वत: जेवण बनवायच्या
आशा भोसले यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवशी दुबईमध्ये एका संगीत मैफिलीत सादरीकरण केले. या कार्यक्रमाबाबत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशा भोसले म्हणाल्या. वय हे फक्त एक आकडा आहे. वय वाढते, पण हृदय नेहमीच तरुण राहते. या वयातही मी उभी आहे, गाणी गात आहे आणि अजूनही माझ्या मुलांसाठी जेवण बनवत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR