33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाची भूमिका ठरली; प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभारणार

मराठा समाजाची भूमिका ठरली; प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभारणार

जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगलेच महत्त्व आले आहे. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार? असे विचारले जात होते. दरम्यान, त्यांनी आजच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभारणार असल्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय गणित चांगलेच बदलणार आहे.

मराठा समाजाशी संवाद साधताना मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भरपूर मराठा समाजाच्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरल्यास अडचणीचे ठरू शकते. सर्वांनीच अर्ज भरल्यास आपली मते विखुरतील. ज्याला फायदा व्हायला नको होता, त्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे एक करता येईल. प्रत्येक जिल्ह्यातून एकाच उमेदवाराला अपक्ष म्हणून उभा करता येईल. हा निर्णय मी घेणार नाही. तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.

मनोज जरांगे यांनी या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने घ्यावयाच्या भूमिकेबाबत सांगताना दुसरा पर्याय दिला. मात्र मराठा समाजाने हा पर्याय स्वीकारला नाही. जरांगे म्हणाले की, लोकसभा हा आपला विषय नाही. तिथे आपलं कोणीही ऐकत नाही. त्यामुळे दुसरा पर्याय असा आहे, तो म्हणजे आपण अर्ज भरायचा नाही. त्याऐवजी मराठा समाजाने इतर पक्षांच्या उमेदवाराकडून बॉण्डवर लिहून घ्यायचं. निवडून आल्यावर सगेसोय-यांच्या मागणीला पाठिंबा देणार का? असं यात लिहून घ्यायचं. आपल्याला पक्षाचा भेद नको. पक्षाचा विचार करायचाच नाही, असा पर्याय जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवला. मात्र सभेला आलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी हा दुसरा पर्याय फेटाळला. त्यामुळे जरांगेंनी हा पर्याय सोडून दिला, असे सभेतच जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR