24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रबहिणीचे प्रेम कमी पडले

बहिणीचे प्रेम कमी पडले

बारामती : बारामतीच्या रणमैदानात आता पवार कुटुंबातच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही. त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्यावर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उद्विग्न उद्गार काढले आहे. बहिणीचे प्रेम कुठे तरी कमी पडले असेल.

दुर्देवाने सर्वच नात्यात अडकले आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना अजितदादांना चांगलेच चिमटे काढले. कदाचित बहिणीच प्रेम कमी पडल असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती हे पाहते. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही. तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली आहे. दादा असे बोलतात याचा मला आश्चर्य वाटते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR