37 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसोलापूरकरमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. मोहिते पाटील कुटुंबाने भाजपविरोधात बंड करत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पवार यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मोहिते पाटलांचा विजय सुकर व्हावा यासाठी पवारांकडून नवनवे डावपेच आखले जात आहेत.

लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अभयंिसह जगताप आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांचे बंड थंड केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे करमाळ्यातील माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात शरद पवारांना यश मिळाले आहे. नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे नारायण पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश सोहळ्यावेळीही नारायण पाटील उपस्थित होते. त्यामुळे तेही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. अखेर या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले असून पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR