28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडले मंत्र्यांचे बॅनर

शिक्षकांच्या अधिवेशनात घुसून फाडले मंत्र्यांचे बॅनर

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवून त्यांना गावबंदी केली जात आहे. रविवारी (दि. २९) नगरमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात घुसून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर लावण्यात आलेले मंत्र्यांचे बॅनर फाडले. दरम्यान कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून आयोजकांनी स्वत:हून हे बॅनर खाली उतरवून घेतले.

नगर शहराजवळील छत्रपती संभाजीनगर रोडवर एका मंगल कार्यालयात रविवारी प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार होते. ते मात्र, या कार्यक्रमाला आले नाहीत.

दरम्यान कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर मंत्री केसरकर यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो होते. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला प्रारंभ होताच कार्यक्रमस्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत थेट बॅनरवर हल्ला चढविला. यावेळी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी असल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान आयोजकांनी स्वत:हून बॅनर काढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR