हा तर २०१५ चाच जुना अणू करार

न्यूयॉर्क : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ऐतिहासिक शांतता करारावर आता अमेरिकेतूनच अंतर्गत विरोध आणि टीका सुरू झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या करारावर जोरदार टोला लगावला आहे. हा नवा करार म्हणजे दुसरे काही नसून २०१५ मधील जुन्या अणू कराराचीच नवीन प्रत आहे अशी घणाघाती टीका ओबामांनी केली आहे.

विशेष म्हणजे, ज्या २०१५ च्या अणू करारातून डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये अमेरिकेला बाहेर काढले होते, हुबेहूब तसाच करार ट्रम्प यांनी आता स्वत: केल्यामुळे अमेरिकन राजकारणात नवा वाद पेटला आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१५ मध्ये इराणसोबत ऐतिहासिक अणू करार झाला होता. या करारानुसार इराणने आपल्या अणू कार्यक्रमावर मर्यादा आणणे आणि अणू बॉम्ब न बनवण्याचे मान्य केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना तपासणीची परवानगी दिली होती. या बदल्यात इराणवरील आर्थिक निर्बंध हटवले जाणार होते. या करारामध्ये इराणचा बॅलिस्टिक मिसाइल कार्यक्रम आणि हिजबुल्लाह-हमास सारख्या लष्करी गटांना मिळणारा पाठिंबा, या मुद्द्यांचा समावेश नव्हता. याच कमतरतेवर बोट ठेवत २०१८ मध्ये ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात अमेरिकेला या करारातून बाहेर काढले आणि इराणवर पुन्हा कठोर निर्बंध लादले होते.

सध्याची परिस्थिती
आश्चर्याची बाब म्हणजे, ट्रम्प यांनी आता केलेल्या नव्या १४ कलमी शांतता करारातूनही इराणचा मिसाइल कार्यक्रम आणि प्रॉक्सी गटांचा मुद्दा पूर्णपणे बाद करण्यात आला आहे, ज्यामुळे ओबामांनी ट्रम्प यांना घेरले आहे.

इराणच्या अणू इतिहास आणि सद्यस्थिती
इराण नेहमीच आपला अणू कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी (वीज निर्मिती) असल्याचा दावा करतो, मात्र अमेरिका आणि इस्रायलचा याला नेहमीच विरोध राहिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news