28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमहानगरपालिकाअंतर्गत महिला बचत गटाची यंदा जलदिवाळी साजरी होणार

महानगरपालिकाअंतर्गत महिला बचत गटाची यंदा जलदिवाळी साजरी होणार

लातूर : प्रतिनिधी
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अमृत २.० अंतर्गत, दि. ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत जल दिवाळी साजरी करण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान’ नावाचा एक अनोखा उपक्रम आयोजित करावयाचे होते. त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ नोव्हेंबर रोजी हरंगूळ जल शुद्धीकरण केंद्र येथे अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले. शहरामधील बचत गटाच्या जवळपास ७५ महिलांनी ड्रेस कोडसह या सहलीमध्ये सहभाग घेतले, बचत गटाच्या महिलांच्या या अभ्यास सहलीस मनपा उपायुक्त्तत मयूरा शिंदेकर यांनी हिरवा झेंडा दाखविले.

स्वयंसहाय्यता बचत गटामधील महिलांना लातूर शहरांमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या वॉटर ट्रिटमेंट प्लांट यांना भेट देण्याची संधी देण्यात आली याच्या माध्यमातून व या भेटींमुळे त्यांना घरोघरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्लांटची व मशीनरीची, पाणी पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची माहिती, पाणी साठवणूक क्षमता, लातूरकरांना दररोज किती पाण्याचा पुरवठा केला जातो, नागरिकांना उच्च व गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणा-या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दल कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजयकुमार चव्हाण व शाखा अभियंता पाणी पुरवठ उषा शिंदे यांनी बचत गटाच्या महिलांना सविस्तर माहिती दिले. जलदिवाळी (पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी) या अभियान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक नितीन सुरवसे, वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष विद्या सूर्यवंशी व बचत गटाच्या महिला तसेच समुदाय संघटक विरेंद्र सातपुते, प्रवीण गर्जे, समूह संसाधन व्यक्ती लोमावती मुळे, शामल भालेराव, निता भालेकर,अनिता पवार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR