FIFA विश्वचषक 2026 ला आजपासून थरारक सुरुवात; शकीरा, बर्ना बॉय यांच्या सादरीकरणाने रंगणार उद्घाटन सोहळा

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या FIFA फुटबॉल विश्वचषक 2026 ला आजपासून भव्य सुरुवात होत आहे. यंदाचा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार असून प्रथमच अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. तब्बल 48 देश, 1248 खेळाडू आणि 104 सामने अशा विक्रमी स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विश्वचषकाच्या उद्घाटन सामन्यात सहयजमान मेक्सिकोचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून फुटबॉल चाहत्यांसाठी पुढील 39 दिवस रोमांच, उत्साह आणि थराराने भरलेले असणार आहेत. स्पर्धेची अंतिम लढत 19 जुलै रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे खेळवली जाणार आहे.

स्टार खेळाडूंवर असणार सर्वांची नजर
यंदाच्या विश्वचषकात अनेक दिग्गज खेळाडू मैदानावर उतरल्याने स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे. पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू Cristiano Ronaldo, अर्जेंटिनाचा सुपरस्टार Lionel Messi, फ्रान्सचा वेगवान आक्रमक Kylian Mbappé आणि ब्राझीलचा स्टार Neymar यांच्यावर जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोनाल्डोसाठी विश्वचषक जिंकण्याचा हा सहावा प्रयत्न ठरणार आहे. नेमारलाही अद्याप विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. दुसरीकडे मेस्सी आणि एमबापे हे दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. मात्र, यंदाच्या स्पर्धेत स्पर्धा अत्यंत चुरशीची असणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उष्ण हवामानाचे आव्हान
यंदाचा विश्वचषक अमेरिकेतील तुलनेने उष्ण हवामानात होत असल्याने खेळाडूंना मोठ्या शारीरिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 1994 नंतर प्रथमच इतक्या उष्ण वातावरणात विश्वचषक खेळवला जात असून त्यावेळीदेखील यजमान देश अमेरिका होता.

उद्घाटन सोहळ्यात जागतिक कलाकारांची मेजवानी
उद्घाटन सामन्यापूर्वी सुमारे 90 मिनिटे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात जागतिक पातळीवरील अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. कोलंबियन गायिका Shakira, नायजेरियन सुपरस्टार Burna Boy, J Balvin, Tyla, तसेच माना, अलेजांद्रो फर्नांडेझ आणि बेलिंडा यांसारखे कलाकार रंगारंग सादरीकरण करणार आहेत.

यंदाच्या विश्वचषकातील खास आकडे
एकूण 104 सामने – विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक.
मेक्सिकोचे अझ्टेका स्टेडियम तीन वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांतील सामने आयोजित करणारे पहिले स्टेडियम ठरणार.
गिल्बर्टो मोरा (मेक्सिको) हा 17 वर्षीय खेळाडू स्पर्धेतील सर्वात युवा फुटबॉलपटू असेल.
क्रेग गॉर्डन (स्कॉटलंड) हे सर्वात ज्येष्ठ खेळाडू म्हणून मैदानात उतरतील.
357 खेळाडूंना पूर्वीच्या विश्वचषकांचा अनुभव आहे.
891 खेळाडू प्रथमच विश्वचषकात सहभागी होत आहेत.

प्रथमच विश्वचषकात झळकणारे देश
यंदाच्या स्पर्धेत Cape Verde, Curaçao, Jordan आणि Uzbekistan हे देश प्रथमच FIFA विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे नवोदित संघांच्या कामगिरीकडेही फुटबॉलप्रेमींचे विशेष लक्ष असेल.

आजचे सामने
मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका
ठिकाण : Mexico City
वेळ : रात्री 12.30 वाजता
दक्षिण कोरिया विरुद्ध झेकिया
ठिकाण : Guadalajara
वेळ : सकाळी 7.30 वाजता

फुटबॉलच्या महासंग्रामाला सुरुवात होत असताना जगभरातील कोट्यवधी चाहते पुढील काही आठवडे या स्पर्धेच्या रंगात रंगून जाणार आहेत. कोणता संघ विश्वविजेतेपदाची मानाची ट्रॉफी उंचावणार, याकडे आता संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!परभणीतून १ हजार शेतकरी पंढरपूरच्या महासभेकडे
02:16
Video thumbnail
BIG BREAKING : ₹2 लाख कर्जमाफी! परभणीत जल्लोषाचा माहोल
02:06
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53

Latest news