पुणे : मराठा आंदोलनाची धग आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. आदोलकांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला आहे. मराठा आदोलकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली आहे.
त्यामुळे नवले पुलाजवळील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा मराठा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. मुंबई आणि साता-याकडे जाणारी वाहतूक अडवली आहे.