राजगडावर दरीत ट्रॅव्हल्स कोसळली; २ ठार

पुणे : प्रतिनिधी
पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. टेम्पो ट्रॅव्हलर बस खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता अंधा-या रात्री बचावकार्य राबवून सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक संदीप तुकाराम गायकवाड (वय ४७) हे अंधेरी (पूर्व), मुंबई येथून ट्रॅव्हल्समधून सुमारे २० प्रवाशांना राजगड किल्ल्यावर सहलीसाठी घेऊन येत होते. शनिवारी रात्री पाबे घाट उतरत असताना पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळून अनेक वेळा पलटी झाली. अपघातानंतर वाहनाचा चुराडा झाला. अनेक प्रवासी वाहनात अडकून पडल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अत्यंत कठीण परिस्थितीत, अंधार, मुसळधार पाऊस आणि खोल दरी यांचा सामना करत जखमींना सुरक्षित बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले.
या भीषण अपघातात विश्वास बाबुराव धातीय (वय २५, नेहरूनगर, विलेपार्ले, मुंबई) तसेच एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतर अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातुरात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी #marathilivenews #maharashtranews
03:01
Video thumbnail
Babasaheb patil on karjmukti|कर्जमाफीवर अखेर सरकारचं मौन तुटलं; सहकार मंत्र्यांचा मोठा दावा!
03:53
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यप्रेमींसाठी गुड न्यूज! नाट्यगृहाचे काम पुन्हा मार्गी
03:19
Video thumbnail
TET परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ परभणीत अभाविपचे तीव्र आंदोलन #marathilivenews
00:10
Video thumbnail
खासदार संजय जाधव यांनी पक्ष सोडल्यानंतर परभणीत उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत #marathilivenews
00:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
45:42
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या पीकविम्यावरून शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा
05:07
Video thumbnail
Latur|अवैध दारूविरोधात महिलांचा एल्गार; विक्रेत्याच्या घरात घुसून मारहाण!
03:05
Video thumbnail
Latur|लातूर DPC बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर;पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
02:53
Video thumbnail
LIVE-बंडखोरी नंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ येथून पहिली जाहीर सभा
00:00
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणावरून लातूरमध्ये एल्गार; ६ जुलैला भव्य मोर्चा!
10:13
Video thumbnail
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस;हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचा अंदाज
04:03
Video thumbnail
Latur|अवैध दारू विक्री करणारा ढाबा संतप्त नागरिकांनी जाळला
04:42
Video thumbnail
Latur|उदगीर तालुक्यात समाधानकारक पाऊस; खरीप पेरणीला वेग
01:21
Video thumbnail
BREAKING : वाशीत दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!
01:03

Latest news