38 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरनवतरूण ग्रामपंचायत सदस्याची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

नवतरूण ग्रामपंचायत सदस्याची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

अहमदपूर : निसर्ग शेती पिकू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही अशी दयनीय अवस्था माझ्या मराठा समाजाची झाली असून हे मी पाहू शकत नाही मला माफ करा म्हणून चिठ्ठी लिहून २६ वर्षाच्या नवतरूण ग्रामपंचायत सदस्याने विष प्राषण करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे तालुक्यात खुपच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असलेला ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य चि. महेश बाबुराव कदम वय २६ वर्षे या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या तालुक्यातील या युवकाने मराठा आरक्षण संबंधी ग्रामपंचायत ठराव मंजूर करून घेतला होता.

स्वत:च्या ग्राम पंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देखील देण्याची त्याची तयारी होती. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून व्यथित व खुपच दु:खी होवून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. उच्चशिक्षित असलेला हा युवक सामाजिक कार्यात नेहमीच या छोट्याशा गावात अग्रेसर रहात होता. लोकांमध्ये मिळून मिसळून राहून लोकांची सतत मनोभावे कामे करणारा असल्याने तो नागरिकांच्या सर्वपरिचित होता.

त्याच्या पश्च्यात वडील सेवा निवृत्त मुख्याध्यापक, एक भाऊ व दोन बहिणी आई, काका असा परिवार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. समाजाला लवकर आरक्षण नाही मिळाले तर आणखी नाहक किती युवकांना आपले प्राण गमवावे लागतील हे सांगता येणार नाही. यासाठी शासनाने मराठा समाजालातील शिक्षण घेतलेल्या युवकांचा सहानुभूतीने विचार करून लवकरच आरक्षण देण्याची मागणी समाजाकडून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR