28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपला फक्त १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे मते

भाजपला फक्त १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे मते

नागपूर : आमच्याकडे असलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपची मते १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे जात नाहीत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग करण्यात आला. पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही. आता त्यांना भाजप चिन्हावर लढणे हाच अखेरचा पर्याय असेल, असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घेतला.

वडेट्टीवार म्हणाले, हिंगोली येथे होणा-या ओबीसी मेळाव्यासाठी आपल्याला दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. मला छगन भुजबळ यांचा कॉल आला. ओबीसी हक्कासाठी आपल्यात मतभेद दिसू नयेत असे त्यांनी सुचवले. त्यामुळे मी या मेळाव्याला जाणार आहे. हा सर्वपक्षीय मेळावा आहे. भुजबळ यांनी देखील ओबीसींसाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. मी देखील ओबीसींसाठी लढण्याची तयारी केली आहे. आम्हाला कुणाचेही नुकसान करायचे नाही. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची भूमिका आहे.

फाईल अडवा आणि एकमेकांची जिरवा

– सरकारमधील तिघांची दिशा वेगळी आहे. दिल्लीने समजावून सांगितले तरी एकमेकांच्या समोर जात नाहीत. फाईल अडवा आणि एकमेकांची जिरवा हा उद्योग सरकारमध्ये सुरू आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR