जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील मंगरूळ, ढोरसांगवी व रामपूरतांडा या तीन ग्रामपंचायतीच्या तसेच लाळी बुद्रुक येथील एका जागेसाठी होत असलेल्या पोट निवडणूक याकरता आज दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जळकोट तालुक्यातील सरपंच पदासाठी १२ तर सदस्य पदासाठी ५१ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सदरील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने मतदान यंत्रासह मतदान अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाहने संबंधितगावाकडे रवाना झाली आहेत.
याप्रसंगी तहसीलदार सुरेखा स्वामी, नायब तहसीलदार राजा खरात, संतोष गुट्टे, पाणीपुरवठा अभियंता स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी सचिन काडवादे, शिवराज एम्पले, आर. पी. शेख , अलिम शारवाले, सुवर्णकार यांच्यासह अनेक अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते . सरपंच पदासाठी मंगरूळ येथे ६ ढोरसांगवी येथे ४ तर रामपूर तांडा येथे २ असे बारा उमेदवार ंिरंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी मंगरूळ येथे २३ ढोरसांगवी येथे १२ तर रामपूरतांडा येथे १४ उमेदवार रिंगणात असून लाळी बुद्रुक येथील पोट निवडणुकीसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत . जळकोट तालुक्यातील या तीन ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.