29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही तुमची चांगली तुतारी वाजविणार

आम्ही तुमची चांगली तुतारी वाजविणार

संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार

पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिघेला पोहचला आहे. संजय राऊत यांनी ‘आम्ही तुमची चांगली तुतारी वाजविणार’असा जोरदार हल्लाबोल करत अजित पवार यांचा समाचार घेतला. बारामतीत आमची सगळी शिवसेना सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. बारामतीची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. पण आता तिथे पवार-विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. बारामतीत आमचेच पारडे जड यासाठी दोन्ही गट दंड बैठका मारत आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी आमची सगळी शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचे संजय राऊत यांनी पुरंदरमधील प्रचार सभेतून सांगितले. यावेळी त्यांनी अजितदादांवर हल्लाबोल केला.

ज्या पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला, तुम्ही कायं केलं, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवार यांच्यावर केला. आचार्य अत्रे म्हणले असते असे हरामखोर १० हजार वर्षात झाले नाही असे म्हणाले असते. तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही आता तुमची तुतारी चांगली वाजवणार आहे. आमची सगळी शिवसेना ताईच्या मागे ठाम पणे उभी आहे, असे ते म्हणाले. कोणीतरी ऐरेंगेरे गुजरातमधून येणारे आणि आमच्या पराभवासाठी बारामती ठाण मांडून बसणार आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शरद पवार यांना संपवायचे आहे. आले किती गेले किती बारामतीमध्ये शरद पवार यांचा दरारा असल्याचे ते म्हणाले.

निकालानंतर जनता तुम्हाला बघणार
अजित पवार यांचं काल भाषण ऐकले, माझे कामे कर नाहीतर बघून घेईल. अरे तुम्ही कायं बघणार ४ जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. तुमच्या धमक्यांना जनता घाबरणार नाही. धमक्या देऊन निवडणूक लढवू नका, जनता तुमच्या धमक्याला भीक घालणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी अजितदादा यांच्यावर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR